वैसार्थ
ब्रह्म, ब्रह्मज्ञान व ब्रह्मसाधना या तीन्हीसाठी ‘परमार्थ’ हा शब्द संत वापरतात. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ व अर्थ म्हणजे ज्ञेय वस्तू. म्हणून अनंत ज्ञेय वस्तूंमधील सर्वोत्कृष्ट वस्तू शोधून काढणे हाच परमार्थ. ब्रह्म किंवा आत्मा ही सर्वोत्कृष्ट वस्तू आहे म्हणून त्याचे ज्ञान म्हणजेच परमार्थ (दासबोध दशक १ समास ९). ब्रह्म कधी न ढळणारे अनंत, स्थिर आहे. ते कल्पनारहित …